समितीकडून वनाधिकारी, परिवहनच्या प्रमुखांना निवेदन
समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
खानापूर, ता. २ : तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान जंगली हिस्त्र प्राण्याकडून होणारे नुकसान थांबवण्यासाठी जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा व पिकांची झालेली नुकसान भरपाई त्वरित द्यावी, यासाठी निवेदन देण्यात आले. तालुका अरण्य अधिकारी श्री संतोष चव्हाण यांनी समितीच्या नेत्यांशी चर्चा करून यापुढे जंगली प्राण्यांचा बंदोबस्त केला जाईल व शेतकऱ्यांची झालेले नुकसान भरपाईचे पंचनामे करून ऑनलाइन द्वारे त्वरित भरपाई मिळवून देण्यात येईल. अशी ग्वाही दिली.
तसेच परिवहन मंडळाच्या खानापूर डेपो मॅनेजर श्री महेश तीरकनवर यांना भेटून खानापूर तालुक्यामध्ये प्रवाशासाठी एसटी ची संख्या वाढवून द्यावी तसेच सकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांची बसेस अभावी होणारी गैरसोय टाळावी. तसेच तालुक्यातील प्रमुख मार्गावर बसची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा द्याव्या पूर्वीपासून सुरू असणाऱ्या गोदगिरी व हेमडगा बस काही कारणाने बंद आहे. ती पूर्ववत करावी. त्याचबरोबर तालुक्याच्या सर्व विभागांमध्ये ज्यादा बसेस सोडून नागरिकांची सोय करावी. अशा आशयाचे निवेदन दिले. वरील सर्व सदस्यांबरोबर आगाराचे व्यवस्थापक महेश तीरकनवर यांच्या बरोबर चर्चा केली. यावेळी त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना फोन करून बंद पडलेल्या बसेस सुरु करण्याचे मान्य करून जादा बसेस साठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी सहदेव पाटील, ज्येष्ठ नेते संभाजी देसाई, पीएच पाटील बळीराम पाटील, रवींद्र पाटील, माजी सभापती सुरेशराव देसाई, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, राजू पाटील आदी उपस्थित होते.
-----------


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या