जिल्ह्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांची बढतीवर बदली
मार्केटचे एसीपी नारायण बरमणी यांचा समावेश
बेळगाव, ता. ३० : बेळगाव जिल्हयात कार्यरत असलेल्या तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारने बढती देऊ केली आहे. त्यात मार्केट एसीपी एन व्हि बरमनी, आय जी पी कार्यालयाचे डी वाय एस पी महांतेश्वर जिद्दी आणि रामदूर्ग उपविभागाचे डी एस पी रामनगौडा हट्टी यांचा समावेश आहे.
मार्केट ए सी पी नारायण बरमनी यांची धारवाड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी तर महांतेश्वर जिद्दी यांची बागलकोट जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक 2 तर रामनगौडा हट्टी यांची विजापूर जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांचे प्रमोशन करण्याचा आदेश बजावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या