दुधाची वाहतूक करणारा टेम्पो
काँग्रेस रस्त्यावर उलटला
बेळगाव, ता. १८ : वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे काँग्रेस रोडवर मिल्ट्री महादेव जवळ दुधाची वाहतूक घेऊन जाणारा (छोटा हत्ती) टेम्पो पलटी झाला. या अपघातात संपूर्ण रस्त्यावर दुधाचे लोंढे वाहू लागले.
या वाहनांमध्ये एक महिला एक लहान मुलगी असल्याची प्रत्यक्षदर्शनी केलेल्या व्यक्तीने माहिती दिली. या घटनेची वाहतूक पोलिसांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी वाहन बाजूला केले. त्याचबरोबर जखमी ना आतडीने हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल केले. टेम्पो रस्त्यावरच आडवा असल्यामुळे थोडा वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती पोलिसांनी वाहन काढल्यानंतर वाहतूक वाहतुकीसाठी मार्ग मोकळा झाला. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली
-----------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या