Type Here to Get Search Results !

रेल्वेची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू


रेल्वेची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू




बेळगाव, ता. १८ :  रेल्वेची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू झाला. देसूर गावात जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वे फाटका जवळ, आज शनिवारी दुपारी 12.15 च्या दरम्यान ही घटना घडली आहे.


भोमाणी चिमाजी नंद्याळकर (वय 60, राहणार – देसुर-बेळगाव) असे रेल्वेची धडक बसून जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही महिन्यापासून भोमाणी चिमाजी नंद्याळकर यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने ते इकडे तिकडे फिरत होते. त्यांना आपण काय करत आहोत हे पण समजत नव्हते असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. आज दुपारी 12.15 च्या दरम्यान ते रेल्वे रूळ ओलांडत असताना, त्यांना रेल्वेची धडक बसून ते जागीच ठार झाले. रेल्वेच्या या धडकेने भोमानी यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले झाले.
-----------------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या