नव्या शाखांमध्ये १५ कोटीं ठेवीनचा टप्पा पार
मराठा बँकेच्या विश्वासार्हतेत आणखीन वाढ
बेळगाव : बेळगाव मधील सहकार क्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवत, नवीनच सुरू केलेल्या दोन शाखांमध्ये ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरत १५ कोटींहून अधिक ठेवी जमा झाल्याने बँकेवरची विश्वासाहर्ता अधिकच दृढ होत चालली आहे. बँकेने ११ मार्च २०२४ रोजी मुतगे ( सांबरा रोड) येथे तसेच १५ मार्च २०२४ रोजी गणेशपूर येथे नव्याने २ शाखा सुरू केल्याने बँकेच्या एकूण ९ शाखा झाल्या आहेत.
नव्याने सुरू केलेल्या शाखांमध्ये १५ कोटींहून अधिकच्या ठेवी जमा झाल्याची माहिती बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील यांनी सोमवारी दिली.
मराठा बँकेचे चेअरमन पाटील म्हणाले, मराठा बँक ही बेळगाव शहर तसेच परिसरामधील बहुजन समाजाचा मानबिंदू आहे. बँकेने सुरू केलेल्या नवीन २ शाखांपैकी मुतगे येथील शाखेमध्ये ५ कोटी २२ लाख रुपयांच्या ठेवी तर गणेशपुर येथील शाखेमध्ये १० कोटी ३५ लाख रुपयांची ठेवी जमा झाल्या आहेत.
५ कोटी ४० लाखाचे कर्ज वितरण सोबत मुतगे शाखेला २० लाख ६० हजार इतका नफा झाला आहे. तसेच गणेशपूर येथील शाखेतून ७ कोटी ६६ हजारांचे कर्ज वितरण होऊन १८ लाख ८५ हजार चा नफा गणेशपुर शाखेला झाला आहे. मराठा बँकेचे ९ शाखांसह १२१८१ सभासद असून भाग भांडवल २ कोटी ८७ लाख आहे. बँकेचे फंड ६९ कोटी ७ लाख असून, एकूण ठेवी २६३ कोटी २९ लाख इतक्या आहेत. बँकेने अन्य बँकांतून व सरकारी रोख्यांतून १४६ कोटी ८५ लाख रुपयाचे गुंतवणूक केली आहे. ३१ मार्च २०२४ अखेर २ कोटी ७५ लाख नफा प्राप्त झाला आहे. बँकेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करण्यात आल्याचे चेअरमन बाळाराम पाटील यांनी माहिती दिली.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या