शिवाजी नगर रस्त्याच्या विकासासाठी 23 लाख मंजूर ः मृणाल हेब्बाळकर
कुदळ मारून विकास कामाला शुभारंम, आज पासून कामाला सुरूवात
शिवाजी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले होते. या रस्त्यावर खड्डी उखडून पडल्याने रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. या रस्त्यावरून आधिक प्रमाणात वाहतुक होत असते. त्यामुळे या रस्त्याचा विकास करण्याची मागणी लोकांतून केली जात होती. या रस्त्याची मागील महिन्यात युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी पाहणी केली होती. या रस्त्याची दुरावस्था पाहून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या विकासाबाबत सुचना दिल्या होत्या. तर स्वतः प्रयत्न करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याचा विकास करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्याप्रमाणे 23 लाख रुपये निधी मंजूर झाला असून या विकास कामाला काॅंग्रेसेचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य रहेमान तहसिलदार, महादेव पाटील, हेमा हदगल, निगुंली चव्हाण, ग्रामस्थ समितीचे अध्यक्ष दयानंद गावडा, मनोहर बेळगावकर, शिवाजी मंडोळकर, प्रल्हाद चिरमुरकर, लक्ष्मण मुगुटकर, कल्लाप्पा कुन्नुरकर, सुरेश किणयेकर, कृष्णा गावडा, हणमंत गोडसे, परशराम हदगल, मदण भडांगे, मेहबुब मुजावर, सुभाष शिंदे, नारायण चव्हाण, तुकाराम चव्हाण आदीसह गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या