Type Here to Get Search Results !

त्या नरधमाला पकडण्यात अखेर पोलिसांना यश

 त्या नरधमाला पकडण्यात अखेर पोलिसांना यश

पुणे - येथील स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. मंगळवारी पहाटे फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आलेल्या तरुणीवर दत्तात्रय गाडे नावाच्या आरोपीनं अत्याचार केला होता.

अत्याचारानंतर तो आपल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गावी गेला होता. पण या घटनेला वाचा फुटल्यानंतर तो फरार झाला होता.


७० तास पोलिसांपासून लपून राहिल्यानंतर अखेर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने आरोपीचा माग काढला आणि एका कॅनलजवळून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मागच्या ७० तासांपासून आरोपी गुणाट गावाजवळील एका उसाच्या शेतात लपून बसला होता. मात्र त्याच्या एका चुकीमुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

खरं तर, आरोपी दोन दिवस उसाच्या शेतात लपून बसला होता. पण इथं त्याला जेवायला मिळत नव्हतं. भूकेनं व्याकूळ झाल्यानंतर आरोपी पाणी पिण्यासाठी दोन दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला होती. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने उसाच्या शेतात शोध घेतला.



अखेर रात्री एक वाजता हा आरोपी कॅनालमध्ये झोपल्याचं पोलिसांना आढळून आलं. यानंतर झोपलेल्या ठिकाणीच पोलिसांनी आरोपीला चहूबाजुने घेरत अटक केली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याला तातडीने गाडीत घालून पुण्याला आणण्यात आलंय. रात्री त्याला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअप मध्ये ठेवण्यात आलंय. पोलिसाकडून त्याची कसून चौकशी केली जातेय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या