कुंभमेळाव्याला गेलेल्या किरण निपाणीकर यांचे हृदयविकाराने निधन
बेळगाव : बेळगावहून प्रयागराज कुंभमेळ्यासाठी गेलेले सामाजिक कार्यकर्ते किरण निपाणीकर यांचे आज गुरुवारी वाराणसी येथे हृदयविकाराने निधन झाले. किरण यल्लाप्पा निप्पाणीकर (वय48) त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुलगे आणि महानगरपालिकेच्या अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांचे ते बंधू होत.
चार दिवसापूर्वी किरण निपाणीकर हे सर्व मित्रमंडळी समवेत प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले असता तेथून पुढे त्यानी वाराणसी येथील मंदिरात दर्शनाला गेले होते. यावेळी मंदिरातच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पर्यावरण प्रेमी किरण निपाणीकर हे बेळगाव ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. लष्करात भरतीसाठी येणाऱ्या युवकांना जेवणाची सुविधा करणारे शैक्षणिक किंवा गोरगरीब युवकांना मदतीसाठी धावून जाणारे कोविडच्या कालावधीत रुग्णांना पुढाकार घेऊन मदतसाठी दोन पावले पुढे येवून मदत करणारे म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या निधनामुळे बेळगाव परिसरात अनेकांना धक्का बसला असून निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
किरण निपाणीकर यांचा मृतदेह उद्या शुक्रवारी सकाळी 9- 00 वाजता बेळगावला आणण्यात येणार असून दहा वाजता अंतविधी होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या