रेणुका देवी मंदिर परिसरातील विकास कामे पारदर्शक होतील : मंत्री एच.के.पाटील
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका (यल्लमा) मंदिरात भाविक दर्शनासाठी कोट्यावधींच्या संख्येने येत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास, अन्नछत्र, उधान, पार्किंग, तसेच दर्शन रांगेसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आवश्यक ती सर्व तयारी करीत असल्याची माहिती, पर्यटन मंत्री एच के पाटील यांनी बुधवारी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते बोलताना असे म्हणाले की, कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका देवी देवस्थानचा विकास तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. नुकताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यासोबत रेणुका विकास मंडळाची बैठक नुकताच पार पडली, त्यानुसार या देवस्थानच्या कायापालट होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 100 कोटी व राज्य सरकारकडून अतिरिक्त निधी उभारण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच या विकास कामाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पर्यटन खाते यांच्यासह संचालक सौम्या बापट व जिल्हा पोलीस अधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या