13 फेब्रुवारी पासून मोदगे (मोहनगा)
श्री भावेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवास प्रारंभ
बेळगाव : कर्नाटक महाराष्ट्र मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील हुक्केरी तालुक्यातील मोदगे (मोहनगा) श्री भावेश्वरी देवीचा वार्षिक यात्रोत्सव गुरुवार 13 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. पाटील ट्रस्ट कमिटी मोदगे आणि श्री बारकाई देवी मंदिर परिसर विकास व यात्रा उत्सव कमिटी मोदगे मुंबई यांच्याकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात यात्रोत्सवाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी शस्त्र इंगळ्या (शुक्रवारी सकाळी सहा पर्यंत सुरूच राहतील) शुक्रवार 14 फेब्रुवारी रोजी भर यात्रा आणि शनिवार 15 फेब्रुवारी रोजी पालखी सोहळा आणि यात्रा समाप्ती


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या