मराठ्यांनो सावध व्हा........तुमच्या सात-बारावर भूमाफियांची नजर
बेळगाव ः शहराच्या विकासाबरोबर शहराची व्याप्तीही मोठ्या झपाट्याने वाढत असून शहरातील लोकांना जागेचा अभाव निर्माण होत आहे. त्यामुळे खुल्या जागांची मागणी अधिक वाढत आहे. परिणामी ग्रामीण भागातील शेतीवर अनेक लोकांचा डोळा आहे. यामध्ये नेत्यांसह भूमाफियांची नजर पडली असून परस्परित्या सातबारावर आपलं नाव दाखल करून कब्जा मारण्याचे प्रकार सध्या ग्रामीण भागात अधिक वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागातील मराठ्यांनी आपला सात-बारा सुरक्षित ठेवण्याची वेळ निर्माण झाली असून सध्याचा राखनदारच शेती जमिनीवर हक्क बजावत आहे. त्यामुळे मराठ्यांनो सावध व्हा.........
बेळगाव शहराचा विकास झपाट्याने होत असून जमिनिचीच्या दरही गगणाला भिडले आहेत. अनेकांना अगदी सहजरित्या पैसे कमविण्याची दिवसा स्वप्न पडत आहेत. त्यामुळे प्रत्येक गल्लीमध्ये भूमाफिया निर्माण होत आहेत. तहसिलदार, प्रांदाधिकारी आणि सर्वे कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सातबारा तपासले जात आहेत. संबंधित उताऱ्याची माहिती गोळा करून नेमकी जमिन कशी आहे. मोक्याच्या ठिकाणी आहे का याची पाहणी केली जात आहे. नेमकता कोणता शेतकरी ती जमिन कसत आहे. याची गावात जाऊन चौकशी केली जात आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला प्रांताधिकारी कार्यालयातून नोटसी पाठविली जात आहे. शेतकरी संबंधित जमिनीची कागदपत्रके घेऊन प्रांताधिकारी कार्यालयात पोचन्यापूर्वीच गैरहजर दाखवून. त्या सातबारा उताऱ्यावर आपले नाव चढविण्याचे बेकयदा काम सुरू आहे. यामध्ये तहसिलदार कार्यालयातील अधिकारी आणि करमचाऱ्यांचाही समावेश आहे. प्रांताधिकारी कार्यालयात नेत्यांच्या सांगण्यावरून काम केले जात आहे. कुळकायद्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या आहेत. मात्र, जा शेकऱ्यांना त्यावेळी संबंधित उताऱ्यावर आपली नावे चढवऊन घेतलेली नाहीत. अशा जमिनीची पडताशणी करून त्या जमिनी बळकावल्या जात आहेत. शेतकरी कुटुंबाला समाज गावगुंडाना जमवून दमदाटीही केली जात आहे. प्रसंगी मारबडवही केली जात आहे. एकूणच जमिनी बळगावल्या जात असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या दशकातही अशा प्रकारे अधिकाऱ्यांना हाताशी धरून काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी बळकावल्या होत्या. मात्र, असे प्रकार घडवून आणणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता पुन्हा अशा पांढऱ्या पोशाख परिधान करून अधिकाऱ्यांवरही दादागिरी दाखविली जात आहे. राठी भागात असे प्रकार अधिक घडत असून संबंधित लोकांच्या हातामध्येत प्रसासन अस्ल्यामुळे त्या शेतकऱ्याची तक्रार देखील नोंद करून घेतली जात नाही. तेव्हा मराठ्यांनो जागे व्हा तुमचे सातबारा बळकावले जात असून अशा व्यक्तीना ठेचून काढण्याची वेळ निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या