Type Here to Get Search Results !

इस्कॉन तर्फे सात दिवसांचा भागवत गीता अभ्यास वर्ग

 इस्कॉन तर्फे सात दिवसांचा भागवत गीता अभ्यास वर्ग


बेळगाव- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने फेब्रुवारी महिन्यात मराठी ,कन्नड व इंग्रजी या तीन भाषांत सात दिवसाचा भागवत गीता अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे.



दि.11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर, टिळकवाडी येथे रोज सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजेपर्यंत होणाऱ्या या अभ्यासवर्गात भगवद्गीता काय आहे, सुखाचा शोध आणि मानवी जीवनाचे महत्त्व, भगवंत कोण आहेत ,मी कोण आहे ,आत्मा काय आहे, पुनर्जन्म ही कल्पना आहे की वास्तविकता ,चांगल्या लोकांच्या बरोबर वाईट का होते ,सर्वोत्तम योग कोणता आणि व्यावहारिक जीवनामध्ये भगवद्गीतेचा उपयोग काय? या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. इच्छुकांनी 90355 30030 किंवा 7264001247 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या