मोठ्या भूकंपाचा इशारा ; लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता !
नवी दिल्ली - सोमवारी सकाळी दिल्ली आणि परिसरातील भागांमध्ये पहाटे 5.37 वाजता भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टर स्केल इतकी होती आणि केंद्र दिल्लीच्या पाच किलोमीटर खोलीवर होते. कमी खोलीमुळे झटके अधिक तीव्र जाणवली.
याच दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिकांनी इस्तांबुल मध्ये मोठ्या भूकंपाचा इशारा दिला आहे. या दुर्मुघटनेत लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत ग्रीसच्या सेंटोरिनी बेटाजवळील भागात जवळपास 8,000 लहान-मोठ्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या