Type Here to Get Search Results !

रिक्षा चालकाच्या मारहाणीत गोव्याच्या माजी आमदाराचा मृत्यू ; खडे बाजारातील घटना

 रिक्षा चालकाच्या मारहाणीत गोव्याच्या माजी आमदाराचा मृत्यू ; खडे बाजारातील घटना

 बेळगाव :  गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार यांचा आज शनिवारी दुपारी बेळगाव शहरातील खडे बाजार परिसरात झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. एका रिक्षा चालकाने केलेल्या जोरदार हल्ल्यात मामलेदार यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.



 दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार हे बेळगाव येथील खाडेबाजार परिसरात असलेल्या श्रीनिवास लॉजमध्ये उतरले होते. आज दुपारी ते आपले कार घेऊन येत असताना एका रिक्षाला कारची धडक बसली. यावरून मामलेदार आणि रिक्षाचालकात वादावादी झाली. यावेळी रिक्षा चालकाने मामलेदार यांना मारहाण केली.. मामलेदार त्या हल्ल्यातून सावरत लॉजकडे निघाले असतानाच रिसेप्शन काउंटर जवळ कोसळले.लॉजच्या मॅनेजरने या घटनेची माहिती मार्केट पोलिसांना दिली. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लहू मामलेदार यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या