जी एस एस चे प्राचार्य अरविंद हलगेकर सेवानिवृत्त तर नविन प्राचार्य म्हणून प्रा. अभय सामंत यांची निवड...
जी. एस एस कॉलेज चे प्राचार्य श्री. अरविंद हलगेकर हे प्राध्यापक, जीवशास्त्राचे समन्वयक, एन. सी. सी. अधिकारी असे अनेक पदावर कार्य करून 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना निरोप देताना एस के इ. चे पदाधिकारी, दक्षिण म. शी . मंडळ या संस्थेचे श्री. विक्रम पाटील, जी एस एस कॉलेजचे प्राध्यापक वर्ग, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी त्यांच्या प्राचार्य पदाच्या कारकिर्दीत कॉलेजला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला व नवीन दर्जेनुसार महाविद्यालय सुरू करण्यात सरांचा मोलाचा वाटा होता. त्यांना निरोप देताना प्रा. अरविंद हलगेकर यांनी NAAC तसेच स्वायत्तता मिळविण्यासाठी करण्यात आलेल्या गोष्टींना उजाळा दिला. त्यानंतर प्रा. अभय सामंत यांनी जी. एस. एस च्या प्राचार्य पदाची सूत्रे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारली. प्रा. अभय सामंत यांनी गेली 34 वर्षे रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. त्याच्याबरोबर त्यांनी रसायनशास्त्र विभाग प्रमुख, पदव्युत्तर पदवी रासायनशास्त्र विभागाचे समन्वयक म्हणून देखील कार्यभार सांभाळला होता. त्यांनाही उपस्थित सर्वानी शुभेच्छा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या