गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडलेल्या त्या महिलेचा मृत्यू
खानापूर : पतीला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा उपचरा दरम्यान आज मृत्यू झाला. 19 जानेवारी रोजी चन्नेवाडी ता.खानापूर येथून आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधी आटोपून आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना झुंजवाड जात होते. दरम्यान या ठिकाणी महिलेच्या पतीला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून ही महिला पडली व तिच्या डोक्याला जबर मार लागला.
तेथून तिला नंदगड तसेच बेळगाव येथील खासगी इस्पितळात नेण्यात आले, त्यानंतर तिला हुबळी येथील किम्स इस्पितळात दाखल करण्यात आले, पण उपचाराचा उपयोग झाला नाही. परिणामी, या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा नाव सावित्री प्रभाकर पाटील असे असून ती अळणावर तालुक्यातील कडबगट्टी या गावच्या रहिवासी होत्या. हा गतिरोधक तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असून त्या ठिकाणी कुठलाही सूचना फलक लावलेला नाही किंवा त्या गतिरोधकावरती पांढऱ्या रंगाचे पट्टेही मारलेले नाहीत. या अपघाताला जवाबदार कोण असा सवाल नागरिकांतून होत आहे, यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे,
------------------


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या