नाथ पै व्याख्यानमालेचा उद्या समारोप
बेळगाव; सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या ५० व्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे पाचवे व शेवटचे पुष्प बुधवार दि. २२-०१-२०२५ रोजी सायंकाळी ५-३० वाजता एसीपीआर सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी बेळगाव येथे मुंबईचे डॉ. मिलिंद सरकार हे *आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली* या विषयावर गुंफणार आहेत. यानिमित्त त्यांचा अल्पपरिचय -
डॉ. मिलिंद सरदार हे ऑल इंडिया सिनियर सिटीझन कॉन्फेडेरेशनच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष, माधवबागचे सीएसआर प्रमुख, आरोग्य शिक्षण समुदायाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. झीटीव्ही, टीव्ही-९, साम टीव्ही व रेडिओ चॅनेलवर आरोग्य शिक्षण या विषयावर भाषण.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे रोग आणि आयुर्वेदिक चिकित्सेने ते रोग पूर्णपणे बरे करणे यासाठी २०१० पासून संपूर्ण भारत भर चळवळ सुरु. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी मधुमेह, बीपी, लठ्ठपणा, थॉयराईड आणि मुख्यतः हृदयरोगवर लक्ष केंद्रीत करुन त्यावर यशस्वी मात.
आहार-विहार-विचार या त्रिसुत्री जीवनशैलीमुळे बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अनेक रोगातून मुक्त केले. 'आरोग्य हृदय संपदा' या चळवळीतून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लाख तणाव तपासण्या मोफत आयोजित करुन ३५ हजार तणाव तपासण्या मोफत पूर्ण केल्या. *स्ट्रेस मॅनेजमेंट* वर सुमारे ४ हजार सत्रे आयोजित केली. सध्या हृदयरोग, मधुमेह पूर्णपणे बरा करणे, स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर संपूर्ण भारत भर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. भारत भरातील सामाजिक कार्यासाठी त्यांना भारतीय ज्येष्ठ नागरिक कडून *प्राईड ऑफ इंडिया* या पुरस्काराने सन्मानीत.
अशा या अनोख्या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड व सहकाऱ्यानी केले आहे


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या