विधानसौध परिसरात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण
बेळगाव : आज सकाळी सर्ण विधानसौध येथे मान्यवरांच्या उपस्थितीत,महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. येथील सीपीएड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस अधिवेशनासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार प्रियंका गांधी यांचे बेळगाव आगमान झाले आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते काँग्रेस अधिवेशन कार्यक्रमाला बेळगावला आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, काँग्रेसचे लोकप्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित आहेत.
यावेळी 1924 मध्ये बेळगाव येथे महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनात घेण्यात आलेले निर्णय, अध्यक्षीय भाषण आणि इतर माहिती आणि दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असलेल्या कन्नड आणि इंग्रजी भाषेतील स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तकांमध्ये 1924 च्या काँग्रेस अधिवेशनाचे ठराव, कोळसा कॅटरी करार आणि आयरिश मताधिकार, सरोजिनी नायडू यांची परराष्ट्र सेवा, भूतकाळातील सत्कार, राष्ट्रीय शैक्षणिक संस्था, बर्माच्या लोकांबद्दलची सहानुभूती, आदी ऐतिहासिक माहिती आणि छायाचित्रे आहेत.
विधानसभा अध्यक्ष बसवराज होरत्ती, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, खासदार प्रियांका गांधी, रणदीप सिंग सुर्जेवाला, सचिव एच.के. पाटील, पालकमंत्री सतीश जारकीहोळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या