ह्रदयद्रावक घटना….
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका नववीत शिकणाऱ्या मुलाने मृत्युनंतरच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी आपल्या पालकांसमोरच जीवन संपवलं आहे. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. परंतु अद्यापपर्यंत मृत मुलाच्या कुटुंबाकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, नववीच्या वर्गात शिकणाऱ्या युवराज राणाने हे टोकाचे पाऊल उचलण्याआधी गुगल आणि यूट्यूबवर 'गरूड पुराण', 'मृत्यूनंतर काय होते', 'मृत्यूचे मार्ग' आणि 'मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो' हे शोधले होते. मुलाने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेलीही आढळून आलेली नाही.
.webp)
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या