Type Here to Get Search Results !

६० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली

 ६० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली


वाराणसी - शुक्रवारी वाराणसीतील मान मंदिर घाटाजवळ ६० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. जल पोलीस आणि खलाशांच्या मदतीने सर्व प्रवाशांना वाचवण्यात आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, गंगेच्या मध्यभागी मान मंदिर घाट ओलांडून एक मोठी बोट आणि एक लहान बोट यांच्यात टक्कर झाल्यानंतर हा अपघात झाला. बोटीतील सर्व भाविकांनी लाईफ जॅकेट घातले होते, यामुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवता आले. घटनास्थळी जल पोलीस आणि एनडीआरएफची टीम उपस्थित आहेत.

या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एनडीआरएफचे बचाव कर्मचारी गंगा नदीतून प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या