Type Here to Get Search Results !

बेळगावात तालुकास्तरीय कामगार प्रशिक्षण कार्यक्रम

 बेळगावात तालुकास्तरीय कामगार प्रशिक्षण कार्यक्रम

तालुकास्तरीय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण रोजगार हमी कायदा-2005 ची माहिती विविध अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन रोजगार हमी कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रम पार पडला ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाचे आयुक्त, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम स्वराज अभियान, कर्नाटक नागरी सामाजिक सेवा संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्राम स्वराज अभियान व पंचायत राज विभागाचे नियोजन संचालक रवी बांगरेप्पा, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश एदगी, तालुका पंचायत सहायक संचालक कडेमनी, कर्नाटक प्रज्वल संस्थेचे राजशेखर बलूतगी आदी उपस्थित होते. यावेळी बोलणाऱ्या अधिकाऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा-2005 ची माहिती दिली. महिलांची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी 50 टक्के आरक्षण ठेवणे, सुविधा देणे, वॉटर लाइफ मिशन, नरेगा आणि महिलांवर विविध योजनांमध्ये सहभाग करून घेणे आदी बाबत माहिती देण्यात आली. तसेच तळागाळातील महिला पर्यंत विविध शासकीय योजना कशा पोचविल्या जाणार याचीही माहिती देण्यात आली. यावेळी कार्यक्रम शकुंतला हादिमानी, लक्ष्मी मांडू, रमेश मदार, पुष्पा आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या