Type Here to Get Search Results !

सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर



सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर

बेळगाव ः येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार २०२४" करिता मराठी विभागासाठी श्री. संजय अण्णासो सुर्यवंशी, ृत्त संपादक दैनिक पुढारी, बेळगाव व कन्नड विभागासाठी श्री. चंद्रकांत सुगंधी, जिल्हा प्रतिनिधी न्यूज १८ चॅनेल. बेळगाव यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच, "प्र. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार २०२४" करिता मराठी विभागासाठी नीलिमा मनोहर लोहार, मराठी उपसंपादक, इन न्यूज चॅनेल, बेळगाव व कन्नड विभागासाठी लावण्या आपय्या अनिगोळ, वार्ताहर, दैनिक कन्नडम्मा, बेळगाव यांना जाहीर करण्यात आला आहे, रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.



सदरहू पत्रकार पुरस्कार शनिवारी (ता.१८) सायंकाळी ५-३० वाजता अउझठ सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी बेळगाव येथे बॅ. नाथ पे व्याख्यानमालेच्या उद्घाटन सोह्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.

l

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या