Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तरुणांचा होणार सत्कार

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तरुणांचा होणार सत्कार

 बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक १५ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे भारतीय सैन्य दलामध्ये नव्याने रुजू झालेल्या तरुणांचा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 

या सत्कार समारंभाला बेळगाव तालुक्यातील भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या नव्या तरुण मंडळींनी वेळेवर उपस्थित रहावे, तसेच या कार्यक्रमाला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी,नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण  समितीच्या सदस्यांनी,महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सचिव अँड एम.जी पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किनयेकर, सचिव शंकर कोनेरी यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या