Type Here to Get Search Results !

यळेबैलात ऊसाच्या मळाल्या आग ः सुमारे एक लाखाचे नुकसान

यळेबैलात ऊसाच्या मळाल्या आग ः सुमारे एक लाखाचे नुकसान 


बेळगाव ः शाॅट सर्किटमुळे ऊसाच्या मळाळ्याला आग लागल्याची घटना  यळेबैल (तालुका बेळगाव) येथे रविवारी (ता.26) दुपारी घडली. परिणामी यामध्ये सुमारे एक एकऱ्यातील ऊस जळाला असून शेतऱ्याचे हातातोंडाला आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. 


यळेबैल येथील नागोजी ईराप्पा शहापूरकर, खाचो ईराप्पा शहापूरकर व वंदना नंदकुमार शहापूरकर यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक 74 मधिल ऊस जळाला आहे. शेतातून हेस्काॅमच्या विजेच्या वाहिन्या गेल्या आहेत. परिणामी याठिकाणी शार्टसर्किट झाल्याने ठिणगी पडली. परिणामी ऊसाच्या मळ्याला आग लागली. आज सकाळपासून वारे जोरात वाहात असल्यामुळे मळाल्या आगीने अधिक जोराने पेट घेतला. त्यामुळे वरिल शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने संबंधित शेतऱ्याला नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या