तलावात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील वाघवडे गावाजवळील तलावात पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली गणेश हिरामणी सुतार रा. वाघवडे (१५) असे मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वाघवडे गावातील तरुण गणेश हिरामणी हा काल घरी न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र, तलावाजवळ त्याचे कपडे आढळून आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला., लागलीच या घटनेची माहिती वडगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या