Type Here to Get Search Results !

लोकायुक्त अधिकाऱ्यांकडून बेळगावतील सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई

 लोकायुक्त अधिकाऱ्यांकडून बेळगावतील सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई


बेळगाव : चार दिवसापूर्वी आयकर खात्याने बेळगावात उद्योजक आणि व्यावसायिकांवर धाडसत्र राबविले होते. आता लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बेळगावमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीर मालमत्ता संपादनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. 

शुक्रवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले., त्यामुळे सरकारी अ धिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. बेळगावचे उपनिबंधक सचिन मंदेड आणि रायबाग पशुवैद्यकीय अधिकारी संजय दुगेनावर यांच्या घरांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या