महिलेस बेदम मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी ; बैलुरतील घटना
बेळगाव येथील तरूणांच्या टोळक्याने महिलेस बेदम मारहाण करून कुटुबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बैलूर (ता खानापूर) येथे घडली आहे. या घटनेत लक्ष्षी खळू कागणकर (४५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बेळगाव येथील श्रीधर पाटील याच्यासह अन्य आठ जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खानापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. शेत जमिनीच्या वादातून ही घटना घडली असून संबंधीत संशयीत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, लक्ष्मी कागणकर आणि गावातील मारूती केरु गुरव यांच्यात अनेक वर्षापासून जमिनीचा वाद सुरू आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान रविवारी (ता.१९) श्रीधर पाटील याच्यासह अन्य आठ तरूणांनी त्यांच्या शेतातील घरात घुसून ही आमची जमिन आहे. आम्ही खरेदी केली आहे. आठ दिवसात घरे खाली करा, अन्यथा जिवंत सोडणार नाही, असे म्हणत लक्ष्मी कागणकर यांना लोखंडी सळीने बेदम मारहाण केली त्यात गंभीर जखमी झाल्या आहेत.
त्यांना जखमी आवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संबंधी खानापूर पोलिसांनी गुन्हा नोंद करुन पुढील तपास चालविला आहे जमिनीच्या वादातून घडलेल्या या घटनेबद्दल बैलूर गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या