Type Here to Get Search Results !

मराठी विद्यानिकेतनात विविध कला प्रदर्शनाचे उद्घाटन

मराठी विद्यानिकेतनात विविध कला प्रदर्शनाचे उद्घाटन 

बेळगाव, ता. ९ : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे हस्तकला-चित्रकला, संगणक प्रकल्प व अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन आज झाले. 

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळा मधील  कलाशिक्षक गजानन गुंजटकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी मराठी विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, शाळा सुधारणा समितीचे सदस्य अरुण देसुरकर, किरण पाटील शाळेच्या शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक नारायण उडकेकर,गजानन सावंत ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.  



या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. यामध्ये कागदाची फुले, पर्स, टोप्या, शोपीस, रंगीबेरंगी हार , टेबल पॉट यासारख्या विविध वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी वर्षभर तयार केलेल्या इतर हस्तकलेच्या वस्तू व चित्रकलेच्या वस्तूंचे प्रदर्शनही मांडण्यात आले आहे. संगणक प्रकल्प प्रदर्शनामध्ये विद्यार्थी विविध प्रोजेक्ट, ॲनिमेशन, सॉफ्टवेअर डिझाईनिंग यांचे प्रात्यक्षिक सादर करत आहेत.



तसेच अटल लॅब प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी व रोबोटिक टेक्नोलॉजीचा वापर करून विविध प्रोजेक्ट मांडले आहेत. प्रदर्शनाच्या मांडणीसाठी कला शिक्षक लता नगरे,लता पाटील, बाळकृष्ण मनवाडकर,संगणक प्रमुख श्रुती बेळगावकर,पद्मजा कुऱ्हाळकर, सोनाली बिर्जे, श्वेता सुर्वेकर, दिपाली पाटील या सर्वांनी परिश्रम घेतले.. हे प्रदर्शन आजपासून मंगळवार 13 फेब्रुवारी पर्यंत सर्वांसाठी साडेनऊ ते चार यावेत वेळेत खुले असणार आहे तरी बेळगाव परिसरातील सर्व कलाप्रेमी नागरिकांनी प्रदर्शनाचा आनंद घ्यावा  असे मराठी विद्यानिकेतन तर्फे कळविण्यात आले आहे.. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रतिभा मसुरकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या