निराधारांना दिला ग्रामपंचायत सदस्याने आधार
बेळगाव, ता. ८ : शासनाच्या नियमाप्रमाणे मरण उतारा हा २१ दिवसाच्या आत काढून घेतला पाहिजे. मात्र, कंग्राळी खुर्द गावातील जोतिबा बाळेकुंद्री यांचे मागील वर्षी निधन झाले होते. पण त्यांच्या पत्नी सुमन जोतिबा बाळेकुंद्री या वयस्कर असल्याकारणाने त्यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर मरण उतारा काढला नाही. परिणामी, त्यांची सरकारी दप्तरी असलेली अनेक कामे रखडली होती. मरण उतारा हा २१ दिवसाच्या आत काढावा लागतो. याबाबत सुमन बाळेकुंद्री यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांची अनेक कामे अडकून बसली होती. या बाबतची माहिती त्यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील यांना देताच, श्री. पाटील यांनी तहसीलदारद्वारे ऑर्डर करून त्यांना तब्बल 10 महिन्यानंतर मरण उतारा उपलब्ध करून दिला. त्यामुळे सुमन बाळेकुंद्री यांनी प्रशांत पाटील यांना प्रेमरूपी आशीर्वाद दिले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या