मार्कंडेयचा गाळप हंगाम १२ रोजी संपणार
बेळगाव, ता. ८ : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम १२ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस लवकरात लवकर कारखान्याकडे पाठवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मार्कंडेय साखर कारखान्याने गेल्या दोन महिन्यात ९५ हजार टन उसाचे झाड केले आहे. तर कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या या आधीच्या सर्व शेतकऱ्यांची बीले खात्यावर जमा केली आहेत. आता कारखान्याचा १२ फेब्रुवारी रोजी गळीत हंगाम संपुष्टात येणार आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला ऊस लवकरात लवकर कारखान्याकडे पाठवून द्यावा, असे आवाहन अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष आर. आय. पाटील यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या