उचगाव क्रॉस जवळ अपघात बेळगुंदीचा एकजण जागीच ठार
बेळगाव, ता. ८ : बेळगुंदी-बेळगाव मार्गा वरील उचगाव क्रॉस जवळ आज सकाळी १० वाजता भीषण अपघात झाला असून दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. दुचाकीस्वाराचा रस्त्यावर मेंदू विस्कटून पडलेला आहे. इतका भीषण आपघात घडला आहे. दुचाकी चालक हा बेळगुंदी येथील रहिवासी असून वाहनाचे मोठे नुकसान झाले.
बेळगावकडून ४०७ हा मालवाहतूक टँपो येत होता. तर बेळगुंदीकडून दुचाकीस्वार भरधाव जात होता. समोरून धडक झाली आहे. मालवाहतूक गाडीच्या अँगलला डोके अडल्याने रक्ताचे डाग दिसत आहेत. दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून बेळगुंदी येथील लमानी कुटुंबातील युवक आहे.
------------------

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या