Type Here to Get Search Results !

समाजाचे स्वास्थ बिघडणाऱ्या धार्मिक शक्तींवर लक्ष ठेवावे ; मुख्यमंत्री सि्धरामय्या

समाजाचे स्वास्थ बिघडणाऱ्या धार्मिक शक्तींवर लक्ष ठेवावे ; मुख्यमंत्री सि्धरामय्या

 


बंगळुर , ता. १७ : हंगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात समाजाचे स्वास्थ बिघडणाऱ्या धार्मिक शक्तींवर लक्ष ठेवावे आणि खोट्या बातम्या पासून त्याचा लाभ उठवणाऱ्या शक्तींवर कठोर कारवाई करावी. अशा कडक सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.



शहरातील नृपतुंगा रोडवरील राज्य पोलीस मुख्यालयात आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना राम लल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये. या दृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अयोध्येत श्रीराम मंदिर येथे बजरंग प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमादरम्यान जातीय दंगल घडू नये यासाठी पोलीस स्थानक स्तरावर माहिती गोळा करून योग्य ती उपाययोजना करावी. अशाही सूचना द्यावी त्यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या