Type Here to Get Search Results !

जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांचे निधन

 जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांचे निधन



बेळगाव, ता. १४ : नेहरु नगर येथील रहिवासी जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांनी दैनिक पुढारी मध्ये दीर्घ काळ सेवा बजावली होती. बेळगाव भागात दैनिक पुढारीचे पाय रोवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. बेळगावातील राजकीय, सामाजिक घडामोडीत त्यांचा सहभाग नेहमी असायचा. त्यांच्या निधनाने पत्रकार क्षेत्रातील तारा निखळला आहे. पत्रकार विकास अकादमी आणि अन्य पत्रकार संघटना स्थापन करण्यात त्यांचे योगदान होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यात ते जेष्ट पत्रकार आणि विचारवंत म्हणून अग्रेसर असायचे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या