'नवहिंद क्रीडा केंद्रा'च्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा
बेळगाव, ता. २६ : येळ्ळूर 'नवहिंद क्रीडा केंद्रा'च्यावतीने 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन अमाप उत्साहात साजरा करण्यात. अध्यक्ष श्री. शिवाजी सायनेकर यांच्या हस्ते 'संविधाना'चे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी 'नवहिंद सोसायटी'चे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी, देशाची समस्या ही माझी समस्या समजून ती दूर करण्याचा प्रयत्न करुया. लोकशाही आबाधित ठेवण्यासाठी संविधानाचे रक्षण करुया, असे विचार व्यक्त केले.
यावेळी नवहिंद सोसायटीचे संचालक मंडळ व सेवकवर्ग, न्यू नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारीवर्ग, प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारीवर्ग आणि नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी नवहिंद सोसायटीचे संचालक मंडळ व सेवकवर्ग, न्यू नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारीवर्ग, प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारीवर्ग आणि नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या