८९ लाख ६० हजार रुपयांचा बनावट मद्यसाठा नष्ट : अबकारी खात्याकडून कारवाई
बेळगाव, ता. ३१ : कणबर्गी येथील रामतीर्थ नगरच्या हद्दीत तब्बल 89 लाख 60 हजार रुपयांचा बनावटीचा मद्यसाठा नष्ट करण्यात आला. या कारवाई अंतर्गत विविध अवैध मद्य वाहतूक आणि विक्री प्रकरणात जप्त केलेला तब्बल 89 लाख 60 हजार रुपयांचा विविध बनावटीचा मद्यसाठा बेळगाव जिल्हा अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नष्ट केला. कणबर्गीजवळील मैदानात जेसीबी लावून हा मद्यसाठा नष्ट करण्यात आला. अवैध मद्य वाहतूक आणि विक्री, गोवा बनावटीचे मद्य, बनावट मद्य विक्री अशा एकूण 101 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मद्यसाठा नष्ट करण्यात आल्याची माहिती अबकारी खात्याकडून देण्यात आली.
एकूण 101 गुन्ह्यात जाप्त करण्यात आलेला बेकायदेशीर मद्यसाठा व बनावट गोवा डिस्टिलरी, बिअर आदी 89 लाख 60 हजार किमतीचा नामांकित मद्यसाठा नष्ट करण्यात आला. यात 18297 लीटर मद्य, 4061 लीटर बिअर, तस्करी मद्य 665 लीटर असा एकूण 89 लाख 60 हजार किमतीच्या मद्यसाठ्याचा समावेश आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अबकारी उपायुक्त वनजाक्षी एम. यांनी बेकायदेशीर दारूचे सेवन करण्यापासून लोकांना रोखणे हा आमच्या विभागाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. सदर मद्यसाठा नष्ट करताना अबकारी खात्याचे विविध अधिकारी उपस्थित होते.
--------------------------


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या