दिव्यांगांच्या विकासासाठी निगमची स्थापना, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आश्वासन
बेळगाव, ता. ६ : हंसध्वनी ही मूकबधिर मुलांची शाळा सरकारकडून ताब्यात घेण्यात आली आहे. सध्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मालमत्ता तब्यात घेण्यात आली आहे. या शाळेला सरकारी वस्ती शाळा करण्यात येणार असून यासाठी 136.35 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहेत. दिव्यांगांना 4000 रुपये वेतन देण्यात यावे व निगम ची स्थापना करावी या विरोधकांच्या मागणीला अनुसरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी विधान परिषदेत बोलताना दिले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या