कावळेवाडीच्या मॅरेथॉन स्पर्धेत भैरव नाईक प्रथम, महिला गटात : सानिका हंजीकर
बेळगाव, ता. ५ : कावळेवाडी (तालुका बेळगाव ) येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनाला माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील उपस्थित होते. हभप शिवाजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे म्हणून मोहन मोरे, रिता बेळगावकर, उदयकुमार देशपांडे, डॉ.मिलिंद हलगेकर, गोपाळराव देशपांडे, प्रा.रुपेश पाटील, जावेद शेख, नीलेश पारकर, सुरेश अष्टगी, बळीराम पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी ऍड. सुधीर चव्हाण, आ. बी.देसाई, बाळेश नाईक गडहिंग्लज, पैलवान मारुती घाडी यांचा पुष्पहार व शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पंच म्हणून बाळासाहेब पसारे, एन.बी.कोळेकर, भरत गावडे अरुण दरेकर यांनी काम पाहिले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी युवराज पाटील, प्रकाश देसाई, मनोहर बेळगावकर, नागेश बेडका, परशराम गोवेकर, मोहन नाईक, एम.ए.नाईक, डॉ.परशराम हुंदरे, दत्तात्रय कुर्विनकोप, ऍड. नामदेव मोरे, जोतिबा मोरे, केदारी कणबरकर, मोनापा मोरे, सूरज कणबरकर, तेजस्विनी कांबळे, कांचन सावंत, किरण यालूरकर, नागेश जाधव, गोपाळ जाधव, पवन कणबरकर उपस्थित होते. प्रास्ताविक वाई.पी.नाईक, सूत्रसंचालन मनोहर मोरे, आभार पी.आर.गावडे यांनी मानले.
कावळेवाडी मॅरेथॉनचा निकाल
चौदा वर्षांखालील मुले
प्रथम प्रेम बुरुड (कावळेवाडी), द्वितीय-सत्यम पाटील (तारेवाडी-गडहिंग्लज), तृतीय वैष्णव जाधव (तारेवाडी), चौथा सोहम कार्लेकर (नावगे), पाचवा वेदांत होसुरकर (टोपिनकट्टी).
चौदा वर्षे मुली प्रथम श्रेया कोळेकर (गर्लगुंजी), द्वितीय - भावना पाटील (बहादरवाडी), तृतीय कृतिका गोवेकर (कार्ले), चौथी सृष्टी नागेनहाटीकर (इडलहोंड), पाचवी सोनम पाटील (बडस).
पुरुष खुली-पहिली भैरव नाईक (आलदार, गडहिंग्लज), द्वितीय भूषण गुरव (सन्नाहोसूर), तृतीय सूरज भालेकर (हलकर्णी), चौथा कृष्णा कांबळे (नेसरी), पाचवा नागेंद्र पाटील (चंदगड).
खुला गट महिला - प्रथम सानिका हंजीकर (यादोगा), द्वितीय सानिका पाटील (हाजगोली), तृतीय पूजा हलगेकर (टोपिनकट्टी), चौथी सौंदर्या हलगेकर (टोपिनकट्टी), पाचवी समिक्षा वेताळ (कल्लेहोळ).


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या