बेळगावातील विद्यार्थिनी बेपत्ता
बेळगाव, ता. ३ : शाळेला जाऊन येते, असे सांगून घरातून बाहेर गेलेली सोळा वर्षीय विद्यार्थ्यांनी मागील दोन दिवसांपासून घरी परतलेलीच नाही.
मधु श्रीनिवास हाशीलकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 9.50 च्या सुमारास ती शाळेला जाण्याचे सांगून घराबाहेर पडली, ती अद्याप घरी परतलेलीच नाही.
बाजार गल्ली, खासबाग ( बेळगाव) येथील या मुलीने घरातून बाहेर जाताना लाल डिझाईनचा टॉप व त्यावर निळे जॅकेट तसेच निळी पॅन्ट असा शाळेय गणवेश परिधान केला होता.पाच फूट दोन इंच उंचीची ही मुलगी गोल चेहऱ्याची आणि गहू वर्णीय आहे .तिच्याविषयी कोणास माहिती मिळाल्यास शहापूर पोलीस स्थानक, मोबाईल क्रमांक 9480804046 यावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या