१७ दिवस बोगद्यात अडकलेले ४१ मजूर काही वेळात बाहेर
उत्तर काशी - उत्तरकाशीतल्या सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम आज मंगळवारी अंतिम टप्यात आली आहे. गेले 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबवणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमडीएमए) व अन्य यंत्रणांना अखेर यश प्राप्त झाले आहे मुजरांपर्यंत त्यांच्या सुटकेची मोठी पाईप पोहचवण्यात आली आहे.अडकलेल्या जागेपर्यंत पाठवण्यात आलेल्या पाईप मधून ते मजूर बाहेर येतील. त्यापूर्वी बोगद्यात रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी प्रत्येक गोष्टींवर जातीने लक्ष ठेवून आहेत. घटनास्थळी बोगद्याच्या बाहेर अनेक रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. मजूर बाहेर आल्यानंतर त्यांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना संपूर्ण रस्ता मोकळा ठेवण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या