Type Here to Get Search Results !

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनीचा स्नेह मेळावा संपन्न.......

 गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनीचा स्नेह मेळावा संपन्न.......   



 बेळगाव, ता. २६ : वि गो साठे मराठी प्रबोधिनीचा स्नेह मेळावादि शनिवारी  (ता.२६) मराठी विद्यानिकेतन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 18 नोव्हेंबर रोजी गुरुवर्य वि. गो साठे प्रबोधनीतर्फे मराठी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या बाल साहित्य संमेलनामध्ये विविध सत्रांमध्ये सहभागी झालेले सर्व मान्यवर, कवी साहित्यिक ,संमेलनासाठी आर्थिक सहकार्य केलेल्या सर्व हितचिंतकांचा एकत्रित असा स्नेहमेळावा प्रबोधिनी तर्फे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनी चे अध्यक्ष जयंत नार्वेकर ,उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव सुभाष ओऊळकर ,साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. तु. पाटील, कवयित्री हर्षदा सुंठणकर , एन. सी. उडकेकर, इंद्रजित मोरे.. उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत सुभाष ओऊळकर  यांनी केले व प्रबोधिनीच्या 25 वर्षाच्या कामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर प्रबोधिनीला आर्थिक व इतर सर्व कामांमध्ये सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार ही व्यक्त केले. या बालसाहित्य संमेलनामध्ये ना. धों. महानोर यांच्या जीवनपटावर आधारित सांगेतिक नाटिका सादर करण्यात आली होती.. याचे दिग्दर्शन  शिवराज चव्हाण यांनी केले होते. त्यांचा प्रबोधिनीतर्फे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. यानंतर  कवयित्री हर्षदा सुंठणकर यांचे 'कवितेचे सादरीकरण ' या विषयावरचे व्याख्यान व द. तु. पाटील यांचे 'मराठी साहित्यातील कवितेचे भावविश्व' या विषयावरती व्याख्यान झाले. प्रबोधिनी च्या रौप्यमहोत्सवी वर्षा बद्दल सर्वांनी शुभेच्छा व आनंद व्यक्त केला...यावेळी प्रबोधिनीचे सदस्य मालोजी अष्टेकर, बसवंत शहापूरकर, विजय बोंगाळे ,अनंत जांगळे, अशोक जांभळे, बी.बी शिंदे,  संजीवनी खंडागळे, प्रा. परसु गावडे, त्याचबरोबर निसर्ग युवक मित्र मंडळाचे एम. एन. राजगोळकर, कॅप्टन कोटगी व त्यांचे सर्व सहकारी. तसेच मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षण संयोजक नीला आपटे व सर्व शिक्षक उपस्थित होते.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धीरजसिंह राजपूत, गजानन सावंत, प्रसाद सावंत यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन श्री. इंद्रजीत मोरे यांनी केले ,आभार मुख्याध्यापक एन.सी.उडकेकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या