Type Here to Get Search Results !

37 वर्षाच्या काळातील सर्व अध्यक्ष, सेक्रेटरी यांचा सत्कार

37 वर्षाच्या काळातील सर्व अध्यक्ष, सेक्रेटरी यांचा सत्कार 



 बेळगाव, ता. २५ : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या स्थापनेपासून 1986 ते 2022 या 37 वर्षाच्या काळात मोलाची साथ केलेल्या सर्व अध्यक्ष व सेक्रेटरी यांचा सत्कार यशस्वी उद्योजक रोहन जुवळी  यांच्या हस्ते  करण्यात आला.यावेळी अध्यक्ष सुनिल मुतगेकर, उपाध्यक्ष अरूण काळे, सेक्रेटरी लक्ष्मण शिंदे व मावळते माजी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ उपस्थित होते. 

  1999 साली सेक्रेटरी तर 2012 साली अध्यक्षपद भुषविण्याचा मान मला मिळाला होता. अध्यक्षपदाच्या  कारकिर्दीत   रौप्यमहोत्सवाचा सुंदर व देखणा समारंभ 450 ते 500 निमंत्रिताच्या उपस्थितीत मराठा मंदिर येथे  संपन्न झाला तो जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या 37 वर्षाच्या  इतिहासातील ' न भूतो ' असा समारंभ झाला. 

   आज 80 सभासदांच्या सहकार्याने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनची सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी होत आहे. ती अशीच यापुढेही कायम राहील असा ठाम विश्वास आम्हा सर्व माजी अध्यक्षांना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या