Type Here to Get Search Results !

शहर समितीची मंगळवारी बैठक

 शहर समितीची मंगळवारी बैठक





बेळगाव, ता. २६ :  सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी कर्नाटक सरकारच्या बेळगांव येथील होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे महामेळावा आयोजित करून कर्नाटक सरकारला आपला विरोध दर्शविणार आहेत. तरी या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी बेळगाव शहर म. ए. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधींसह नागरिकांची बैठक मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 सायं. 5.00 वाजता रंगूबाई पॅलेस, रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे अध्यक्ष श्री. दीपक दळवी कळवितात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या