Type Here to Get Search Results !

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ आनंद के. यांनी गळफास घेऊन आत्महत्या

 बोर्डाचे सीईओ आनंद के. यांनी जिवन संपविले 


बेळगाव, ता.२५ : कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ आयएएस अधिकारी आनंद के. यांनी कॅम्प येथील आपल्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवन संपवले. शनिवार (दि.२५) सकाळी ही घटना घडली असून कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डातील १९ जागांसाठी झालेल्या कर्मचारी भरतीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सीबीआकडे करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सीबीआयचे अधिकारी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ व इतर अधिकारी आणि भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करत होते. चौकशीचा ससेमिरा लागल्याने आज सीईओ आनंद के. यांनी टोकाचे पाऊल उचलले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या