Type Here to Get Search Results !

ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेत अंतरशालेय स्पर्धा संपन्न

 ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेत  अंतरशालेय स्पर्धा संपन्न    



 बेळगाव, ता. २४ : येथील दि आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये आंतरशालेय विविध स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.  यामध्ये वेशभूषा व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या . या स्पर्धेमध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते . प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या व्यवस्थापिका भक्ती देसाई उपस्थित होत्या. तसेच भक्ती महिला सोसायटीच्या व्हाईस चेअरमन रूपाली जनाज व श्री राजमाता सोसायटीच्या व्हाईस चेअरमन प्रतिभा नेगिनहाळ   या उपस्थित होत्या. नृत्य स्पर्धेसाठी गणेश घाडगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका फरीदा मिर्झा व सांस्कृतिक विभागाच्या शीतल पाटील, संध्या सुतकट्टी , ख्रिस्तीना अँथोनी यांचे सहकार्य लाभले.  यावेळी सर्व मुलांचे प्रमाणपत्र व चषक देऊन गौरव करण्यात आला . यावेळेस पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते . शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम पार पडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या