Type Here to Get Search Results !

हेस्कॉमची ऑनलाईन सेवा तीन दिवस असणार बंद

 

हेस्कॉमची ऑनलाईन सेवा तीन दिवस असणार बंद 


बेळगाव, ता. २१ : हेस्कॉमसह राज्यातील पाच वीज वितरण कंपन्यांची ऑनलाईन सेवा शुक्रवारपासून (ता. २४)  ते रविवारपर्यंत (ता. २६) बंद असणार आहे. 

वेब पोर्टलची दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कंपन्यांनी दिली आहे.

राज्यात हेस्कॉमसह गेस्कॉम, मेस्कॉम, चेस्कॉम व बेस्कॉम अशा पाच कंपन्या वीज वितरणाचे काम करतात.' राज्यातील ९६ शहरांतील वीज ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट सिस्टिमचा लाभ मिळतो. मात्र ही सेवा २४ ते २६ या काळात तीन दिवस बंद राहणार आहे. शुक्रवारी दुपारी १२ पासून रविवार दि. २६ सकाळी ११.५९ पर्यंत या सेवा बंद राहतील. त्यामुळे, ऑनलाईनच्या माध्यमातून वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होणार आहे.

वेब पोर्टलच्या आपत्कालीन तांत्रिक देखभालीच्या कामामुळे ही सेवा बंद विस्कळीत होणार आहे. डेटा नवीन पोर्टलवर हस्तांतरित करण्याचे काम सुरु असल्याने ऑनलाईन सेवा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे, दोन दिवस वीज बिल भरणा, नवीन कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्जासह कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही असे कळविण्यात आले आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या