वंदे भारत एक्सप्रेस बेळगावात दाखल
बेळगाव, ता. २१ : बेळगावकरांनी आज दुपारी वंदे भारत एक्सप्रेसचा अनुभव घेतला. या आगळ्या वेगळ्या रेल्वेने अनेकांच्या नजरा आकर्षित करून घेतल्या. बेळगाव रेल्वे स्थानकावर पाहण्यासाठी गर्दी झाली आणि प्रत्येकाच्या तोंडातून उद्गार उमटले वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे नसून जमिनीवरचे विमानच आहे.
दुपारी ऐवजी पहाटे बेळगाव मधून निघून दुपारी बंगळुरुला पोहोचल्यास प्रवाशांना आणखी सुखकर होईल अशीही मागणी यानिमित्ताने झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या