Type Here to Get Search Results !

दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या जवळील 6 लाख 79 हजार किंमतीच्या 14 दुचाकी जप्त केल्या

 दुचाकी चोरट्यांना अटक


6 लाख 79 हजार किंमतीच्या 14 दुचाकी जप्त


बेळगाव,  ता.२७ : विजापूर जिल्ह्यातील आंतरराज दुचाकी चोरनाऱ्या तिघाना अटक करून त्यांच्या जवळील 6 लाख 79 हजार किंमतीच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई खडेबाजार पोलिसांनी केली 

महेश निंगप्पा मदार (वय 23) मूळचा रा. कुरबरदिनी ता.कोल्हार सध्या अथार्गा रा.तालुका इंडी विजापूर, अमीर बाबू एळगी (वय19) रा.अथर्गा इंडी विजापूर आणि प्रशांत मोरे (वय 21) रा.अथर्गा इंडी विजापूर अशी तिघा चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरट्यांनी बेळगाव गोवा अथनी विजापूर आणि महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे. पोलिसांनी यांच्या कडून 1 टी व्हीं एस अपाचे, 2 बजाज पल्सर एन एस मोटार सायकल,5 हिरो होंडा स्पलेंडर, 2 होंडा शाईन,1 बजाज प्लटिन,1 हिरो होंडा स्पलेंडर प्रो अशा दुचाकींचा समावेश आहे.

या जप्त केलेल्या दुचाकित खडे बाजार पोलीस स्थानक व्याप्तीत चोरलेल्या 4, अथणी पोलीस स्थानक व्याप्तीत 1 दुचाकींचा समावेश आहे. तर इतर जप्त केलेल्या गाडी मालकांचा शोध सुरू आहे. पोलीस उपायुक्त स्नेहा व एसीपी अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजार  पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आदी सहकाऱ्यांनी पोलिसांनी सदर ही कारवाई करून दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

18 जून रोजी खडेबाजार पोलीस स्थानक व्याप्ती मध्ये झालेल्या दुचाकी चोरीचा तपास लावताना या आंतर राज्य टोळीचा पर्दाफाश बेळगाव पोलिसांनी केला आहे. पोलीस आयुक्त डॉ सिद्धरामाप्पा यांनी तपास अधिकारी आणि खडे बाजार पोलिसांचे कौतुक करून या तपास लावलेल्या पोलिसांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या