Type Here to Get Search Results !

बेळगुंदी भागात वीज गायब : उद्योजकातून तीव्र नाराजी

 

बेळगुंदी भागात वीज गायब : उद्योजकातून तीव्र नाराजी

उन्हाळ्यात दुरूस्ती ; तरी पुरवठ्यात अडथळा कायम 

 

बेळगाव ः बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात विजेचा लपंडाव सुरू असून अचानक विज गायब होत असल्यामुळे घरगुती कामासाठी सुरू असलेली विजेची उपकरणे बंद होत आहेत. परिणामी अनेक कामे खोळबंली जात असून हेस्काॅमच्या या कारभाराबद्दल लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ऐनपावसाळ्यात विज गायब केली जात असल्यातून ग्रामीण भागातील लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 


बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात नेहमी हेस्काॅमकडून सुरळीत विज पूरवठा केला जात नाही. या बाबात अनेकवेळा हेस्काॅमच्या अधिकाऱ्यांकडे सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी केली गेली आहे. मात्र, याकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला असून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. आता पावसाळा असल्यामुळे वीजेच्या वाहिन्यांना झाडांच्या फांद्याचा स्पर्श होत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचे हेस्काॅमच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, पावसाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी दुरूस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला गेला. त्यावेळीही लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता पुन्हा विद्यूत वाहिन्याना फाद्यांचा स्पर्श होत असून वीज पुरवठा खंडित होत आहे. असे अधिकऱ्यांकडून कारणे दिली जात आहेत. सतत एकच कारण पुढे करत असल्यांने लोकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बेळगुंदी भागात काजू कारखांने अधिक असून सध्या हंगाम जोरात आहे. मात्र, गेल्या आठ दिवसापासून सतत सुरू असलेल्या वीजेच्या लंपडावामुळे बेळगुंदी भागातील काजू उद्योजक त्रस्त झाले आहेत. सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी अनेक उद्योजकांनी हेस्काॅमच्या अधिकऱ्यांना फोनवरून मागणी केली. दरम्यान अधिकाऱ्यांनी पाच मिंनिटात येते, दहा मिंनिटात येते असे आश्वासन दिले. मात्र, तीन ते चार तास वीजपुरवठा गायब होत आहे. हेस्काॅमच्या अधिकाऱ्यांच्या या फसवेगीरीमुळे उद्योजकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

काजू कारखान्यांमध्ये महिला कामगार अधिक असून महिलांना रोजगा उपलब्ध झाला आहे. मत्रा, सतत विज पुरवठा खंडित होत राहिल्यामुळे महिला कामगारांनीही विजेची वाट पाहात कारखान्यात खाली बसून राहावा लागत आहे. त्यामुळे कागारांतूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 
-------------------------------
तालुक्यात काजू प्रक्रिया उद्योग अधिक असून पश्चिम भागात अधिक आहेत. सध्या हंगाम जोरात सुरू आहे. मात्र, सतत विज पुरवठा खंडित केलात जात असल्याने अनेक कामात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी अधिकऱ्यांकडे केली आहे. मात्र, अधिकारी दुरूस्ती असल्याचे सांगत अघोषित वीज पुरवठा खंडित केला जात आहे. याचा परिणाम उद्योगावर होत असून कामगारांनाही याचा मोठा फटका बसत आहे. तरी हेस्काॅमने सुरळीत वीज पुरवठा करावा. 
कृष्णा पाटील 
सचिव, बेळगाव तालुका काजू प्रक्रिया उद्योजक असोसिएशन 
--------------------------------------------------


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या