Type Here to Get Search Results !

मंदिरावर दगडफेक करणाऱ्या युवकाला अटक

मंदिरावर दगडफेक करणाऱ्या युवकाला अटक 

बेळगाव : पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक केल्याने त्या युवकाला  मार्केट पोलिसांनी अटक करून गुन्हा नोंद केला आहे. यासिर  युसुफ नेसरगी ( वय 19, राहणार उज्वल नगर बेळगाव) असे त्या युवकाचे नाव  आहे. बुधवारी रात्री  बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली मध्ये ही घटना घडली. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पांगुळ गल्लीतील प्रसिद्ध अश्वत्थामा मंदिरावर त्या युवकांने दगडफेक करताना त्याला रंगेहाथ पकडून जमावाने खांबाला बांधून ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात बराच काळ तणाव निर्माण झाला होता.

या घटनेची माहिती माहिती मिळताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केले. सदर युवकाला ताब्यात घेत सुरक्षित रित्या पोलीस स्थानकात हलवले. 

पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी  प्रकरणी माध्यमांशी बोलताना सांगितले की  त्या युवकाचे मानसिक संतुलन  बिघडल्याने त्याने मंदिराच्या गेटवर दगडफेक केली. होळी  दरम्यान युवकाने बुरखा पोशाख परिधान केला होता त्या घटनेचा बदला घेण्यासाठी मंदिराच्या गेटवर दगडफेक केली आहे. सदर युवकावर मानसोपचाराकडे उपचार देखील सुरू आहेत.

याप्रकरणी सदर युवकावर  मार्केट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराच्या गेटवर दगड फेक झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते मात्र  मार्केट पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल आधी  सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या