बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना आकाश चौगुले यांचे मार्गदर्शन
बेळगुंदी : दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती किंवा ताण- तणाव न बाळगता, न डगमगता तणाव विरहित परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. असे मार्गदर्शन सहआयुक्त आकाश चौगुले यांनी विध्यार्थ्यांना केले.
बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याना परीक्षेला कसे सामोरे जावे पेपर सोडवताना कोणती काळजी घ्यावी या बाबत सविस्तर माहिती श्री चौगुले यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी ते म्हणाले, आपली उत्तर पत्रिका हा आपला आरसा असतो म्हणून उत्तर पत्रिका सोडविताना स्वच्छ, सुंदर, नीटनेटकी सोडवावी. कारण आपल्या उत्तर पत्रिकेवरूनच आपले मूल्यमापन मूल्यमापक करत असतो. मूल्यमापकावर चांगली छाप पाडण्याचे काम आपली उत्तर पत्रिका करत असते. तीन तासाचा पेपर वेळेत पूर्ण कसा होईल याचे नियोजन करणे आवश्यक आहे. या साठी प्रश्नपत्रिका सोडविण्याचा व लिहिण्याचा सराव केला पाहिजे व गुण बघून ते उत्तर लिहिले पाहिजे. अशा अनेक महत्त्वाच्या सूचना करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर संयोजक श्री शंकर चौगुले माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर , राजू मुजावर, दशरथ पाऊसकर, सुनील जाधव सर विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन रश्मी पाटील यांनी केले तर आभार ही त्यांनीच मानले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या